काही दिवसा पूर्वी मी एक स्फुट कविता लिहिली होती.या कवितेची पार्श्व भूमी अशी कि…..बरेच दिवसात कोणीही इमेल पाठवली नव्हती. मला इ मेल म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला लिहिलेला मजकूर अपेक्षित असतो.त्यामुळे वाट बघून बघून लिहिलेली हि एक कविता.
ही कविता ४ जुलै २००९ च्या सकाळ च्या पैलतीर विभागात छापून आली होती.
******************************************************************************************************************************************************************************************
इ-मेल
नका पाठवू मला फॉर वर डेड मेल्स
र ला ट जोडलेल्या कविता
आणि ओढून ताणून केलेले जोक्स
नको आहे मला माहितीचा महा पूर
अथवा एखाद्या देव देवतांची चेन मेल
परंतु हे लक्षात ठेवा ,
करा मला तुमच्या सुख दुक्खात सामील
हसेन नाचेन तुमच्यासवे
अथवा देईन अश्रूंची साथ
करावयाचा आहे बंद मला हा रोजचा चातकाचा खेळ
कोणीतरी भेटेल म्हणून कॉम्पुतेरवर घालवायचा वेळ
असेन मी एका क्लिक च्या अंतरावर
जमले तर पाठवा मेल
अर्थात तुम्हाला वेळ झाल्यावर
सल्ला,आशीर्वाद,प्रेम यांची ओढ आहे मला
फक्त तेव्हढ्यासाठी वाटे मला इ-मेल चा आधार भला

I am impressed with volume of stories … I wish I can read Marati … Keep it going … awesome work …